स्वामी विवेकानंद संकुलात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
उदगीर (प्रतिनिधी) येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर जगताप होते.तर मंचावर शैक्षणिक संचालक संजय हट्टे,संस्था सदस्य राघवेंद्र जाधव,महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.भिमाशंकर कोडगे,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश तोलसरवाड,कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मनोरमा शास्त्री,नर्सिंगच्या उपप्राचार्या ज्योती स्वामी,जयहिंद पब्लिक स्कुलचे उपप्राचार्य सतिष वाघमारे,मानव संसाधन प्रमुख कृष्णा गठ्ठडे,प्रा.परशुराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री.जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे अफाट असे आहे. त्यांनी येथील अठरापग्गड जातींच्या मावळ्यांना सोबत घेऊन राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांना खरी मानवंदना ही त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणणे ही असेल असे सांगितले.
डॉ.कोडगे यांनी, छत्रपती शिवजी महाराज यांच्या कार्याचा अभ्यास करा,त्यांच्यावरी पुस्तके वाचा,चित्रपट पाहा,धारावाहिक पाहा या सगळ्यांतून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल व तुम्ही यशाकडे वाटचाल कराल.
अध्यक्षीय समारोपात डॉ.जगताप यांनी,छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याची बाब नाही तर, त्यांना डोक्यात घेऊन आचरणात आणण्याची बाब आहे. त्यांच्या चरित्रातून बोध घेऊन वाटचाल करण्याची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांवर विद्यार्थ्यांनी गीत,नृत्य,पोवाडे सादर केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेश शिंदे यांनी तर आभार धोंडिबा शिंदे यांनी मानले.कार्यक्रमास स्वामी विवेकानंद महाविद्यालय, अध्यापक विद्यालय व महाविद्यालय, फार्मसी,कनिष्ठ,
नर्सिंग,जयहिंद पब्लिक स्कुलचे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
स्वामी विवेकानंद संकुलात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी