जयहिंदला दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेचे केंद्र
उदगीर (प्रतिनिधी)
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयहिंद पब्लिक स्कुलला दहावी सीबीएसई बोर्ड परीक्षेचे केंद्र मंजूर झाले आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर जगताप यांनी दिली.
केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ नवी दिल्लीची मान्यता असलेले जयहिंद पब्लिक स्कुल हे २०१०पासून चालु आहे. स्कुलच्या विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाची परीक्षा देण्यासाठी लातूरला जावे लागत असे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना लातूर येथे परीक्षा केंद्रास जाण्यासाठी सोसावी लागणारी आर्थिक झळ आणि वेळेचा अपव्यय या अडचणी लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर जगताप यांनी परीक्षा विभागाकडे सतत पाठपुरावा करुन जयहिंद पब्लिक स्कुलमध्ये उदगीरमधील पहिले सीबीएसई बोर्ड दहावीचे परीक्षा केंद्र मंजूर करुन आणले आहे. दि.२६ फेब्रुवारी (मंगळवार) पासून परीक्षा केंद्रावर परीक्षेस सुरुवात झाली आहे. परीक्षा केंद्राचे केंद्र संयोजक म्हणून राजेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षा तणावमुक्त वातावरणात व्हावी यासाठी स्कुलकडुन सर्व तयारी करण्यात आली आहे. दहावीच्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुधीर जगताप, शैक्षणिक संचालक संजय हट्टे, प्राचार्या मनोरमा शास्त्री, उपप्राचार्य सतिष वाघमारे, मानव संसाधन प्रमुख कृष्णा गठ्ठडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.