आईच्या निधनानंतरही सत्यपाल महाराजांनी केले प्रबोधन

आईच्या_दुःखद_निधनाची_वार्ता_कळल्यावर_सुध्दा  सत्यपाल_महाराजांनी_केले_हजारोंचे_प्रबोधन...


  आकोला / प्रतिनिधी


 राष्ट्रीय कीर्तनकार सप्तखंजेरीवादक प्रबोधनसम्राट सत्यपाल महाराज यांच्या आई श्रीमती सुशीलाबाई विश्वनाथ चिंचोळकर यांचे दीर्घ आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी २१ फेब्रुवारी २०२० रोजी  सायं ७:०० वाजता अकोट जिल्हा अकोला येथील जिजामाता चौक निवासस्थानी दुःखद निधन झाले.त्याच दिवशी सत्यपाल महाराज हे दुपारी ३:०० वाजता अकोट वरून वर्धा जिल्हात तरोडा या गावी कीर्तनाला गेले यावेळी कीर्तनाच्या गावात सायं ७:१० मिनिटांनी गेल्या बरोबर आपल्या आईच्या दुःखद निधनाची वार्ता मोबाईल द्वारा मुलगा डॉ.धर्मपाल यांनी महाराजांना दिली.पण आजचा जो महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम होता त्याची तारीख आयोजकांनी एक ते दीड वर्षा आधी महाराजांना मागितली होती आणि या जाहीर प्रबोधनाच्या कीर्तनाला दररोज सारखीच हजारोंची (२० हजार)उपस्थिती होती.


इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसल्यावर सुद्धा महाराजांनी स्वतःला सावरत आयोजक व उपस्थित हजारो मायबाप जनता जनार्धन यांचा सर्वस्व विचार करत मुलगा डॉ.धर्मपाल यांना मोबाईल वर संपर्क करून आई सुशीला यांचा मरणोत्तर नेत्रदान व देहदान हा प्रेरणादायी इच्छासंकल्प पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या व सांगितले मी इतक्या लवकर घरी पोहचू शकणार नाही तरी तुम्ही आईची मरणोत्तर नेत्रदान व देहदान ही इच्छा पूर्ण करावी.मी कीर्तनाचा कार्यक्रम करून निघतो.
          या वेळी डॉ.धर्मपाल यांनी वडील सत्यपाल यांच्या सुचनेने पालन करत तुरंत रात्री ०८:३० वाजता आजीचे पार्थिव अकोला मेडिकल कॉलेज ला नेत्रदान व देहदानाकरिता अकोट वरून अकोला येथे नेण्याची तयारी केली.त्याआधी अंत्यदर्शनाकरिता रात्री ७:१५ ते ८:३० वाजेपर्यंत अकोट स्थित निवासस्थानी पार्थिव ठेवले होते.निसर्गवासी आई सुशीला यांचे पार्थिव अकोट वरून अकोला करिता निघाले व सत्यपाल महाराजांनी स्टेजवर प्रबोधनात्मक कीर्तनाला हजारोंच्या उपस्थितीत दररोज सारखी सुरवात केली.अकोला येथे मेडिकल कॉलेज ला रात्री १०:३० वाजता परिवारातील सदस्य तसेच शेकडो हितचिंतक मान्यवरांच्या उपस्थितीत निसर्गवासी आई सुशीला यांचे नेत्रदान व देहदान संपन्न झाले.तिकडे तरोडा जिल्हा वर्धा येथे सत्यपाल महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला.


सप्तखंजेरीचा जादूगर प्रबोधनसम्राट ज्याचे पाळण्यातील नाव सत्यपाल ठेवणारी आई आज आपल्यातून निघून गेली...


अकोला येथे नेत्रदान देहदानाला उपस्थिती -
निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे,आई सुशीला यांचे नातू न्यायमूर्ती सत्यदेव बेदरकर,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक पटोकार,डॉ.गजानन नारे,डॉ.अमोल रावनकार,पंकज दादा जायले,ऍड.संतोष भोरे,विजय सारभूकन,डॉ.रामेश्वर बरगट,बलदेव पाटील,रमेश मुरकर,ज्ञानेश्वर साकरकार,पंकज साबळे,पराग दादा गवई,चंदू सिरसाट,मनेश चोटमल,उपेंद्र गावंडे,विनोद सिरसाट,सावळे गुरुजी,शिवाजीराव म्हैसने,खेडकर दादा,सचिन माहोकार,तुषार बरगट, अनिकेत तायडे,आकाश हरणे,झामरे दादा,दामोदर शृंगारे,दिनेश ठोकळ,श्रीकांत बिहाडे,प्रवीण खेते,डॉ.काकड व समस्त गुरुदेव सेवा मंडळ अकोला जिल्हा सदस्य यांच्यासह परिवारातील सदस्य व शेकडो हितचिंतक उपस्थित होते.