महात्मा फुले परिवाराच्या वतीने भव्य शिवजयंती साजरी

महात्मा फुले परिवाराच्या वतीने भव्य शिवजयंती साजरी


अहमदपूर/प्रतिनिधी


        महात्मा फुले परिवाराच्या वतीने भव्य शिवजयंती साजरी करण्यात आली.या मिरवणुकीचे उद्घाटन माननीय आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.आर.झोडगे साहेब हे होते.प्रमुख अतिथी  बाळासाहेब जाधव,माजी आ. विनायकराव पाटील ,नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, सभापती गंगासागर जाभाडे ताई ,उप सभापती बालाजी गुट्टे,दिलीपराव देशमुख दत्तूआप्पा जाधव, बाळासाहेब कासनाळे,विश्व़ंभर स्वामी, बाळासाहेब आगलावे, अभय मिरकले,सांब महाजन, माधव जाधव, बालाजी जगताप, प्रशांत भोसले, पापा आय्या
चंद्रकांत मद्दे,शिवानंद हेंगणे,
 अमित रेड्डी,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, तसेच प्रा. वसंत बिरादार, मु.अ एस आर जाधव ,प्रा.मु.अ प्रकाश कदम,ए.एस.सूर्यवंशी, टी.आर कांबळे यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील सर व माने सर यांनी तर आभार मुसळे सर यांनी केले.                                      
        यावेळी ३९० व्या शिवजयंतीनिमित्त अहमदपूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीतून महात्मा फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे समाजप्रबोधनात्मक देखावे,नृत्य,क्रीडा यांच्या माध्यमातून सामाजिक शिवकालीन संदेश देवून जनजागृती केली.   या प्रसंगी शिवप्रबोधनात्मक देखाव्यात लेझीम पथक ,रोप जंप पथक,स्वच्छ भारत अभियान पथक, जगदंबा पथक,तमिळ नृत्य पथक, मुस्लीम मावळा पथक,नमन पथक, गणेश आरती पथक,
मल्हारी पथक, गरबा नृत्य पथक,बंजारा पथक, भांगडा पथक,वाघ्या मुरळी पथक, टिपरी पथक , व्यसनमुक्ती पथक,झांज पथक ,झेंडा पथक,गजाढोल पथक, शंकरा पथक ,आदिवासी पथक,मावळे, छत्रपती शिवाजी महाराज,बाल शिवाजी, विविध राष्ट्र पुरुष , राष्ट्र महिला, यांच्या वेशभूषा, साकारण्यात आल्या होत्या.
      या प्रसंगी अब्दागिरी ,तुतारी,घोडे,ऊंट, तैलचित्रे, समाजप्रबोधनात्मक फलक ऐतिहासिक देखावे यांचा मिरवणुकीत सहभाग होता.यावेळी अहमदपूर पंचक्रोशीतील सर्व जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.ही मिरवणूक यशस्वी करण्यासाठी पोलिस अधिकारी पत्रकार बांधव सामाजिक कार्यकर्ते शिवप्रेमी तसेच महात्मा फुले परिवारातील सर्व कर्मचार्यांनी मोलाचे योगदान दिले व सायंकाळी ठीक ५;३० वाजता मिरवणुकीची सांगता झाली.