पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक
मुंबई/प्रतिनीधी
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, संसदीय कार्य, भुकंप व पुनर्वसन, पाणी पुरवठा राज्य मंत्री मा. ना. संजय बनसोडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 18/02 /2020 रोजी विधानभवन, मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत राज्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांना निधी कमी पडणार नाही अशी काळजी शासनस्तरावर घेण्यात येणार आहे. अशी माहिती मा.मंत्री महोदय यांनी दिली. या बैठकीला विभागाचे उपसचिव अभय महाजन, सहसचिव नरेश गिते, अप्पर सचिव वंसत माने , अवर सचिव मोटे चंद्रकांत उपस्थित होते.