कोरोना संदर्भात प्रशासकीय आदेशाचे पालन करून आपणच आपल्या जीवनाची हमी घ्यावी

कोरोना संदर्भात प्रशासकीय आदेशाचे पालन करून आपणच आपल्या जीवनाची हमी घ्यावी
----------------------------------
गिरीधर गायकवाड
--------------------------------
लातूर : कोरोना विषाणूने संपूर्ण जगातच रुद्र रूप धारण करून आज चीन इटाली सारख्या प्रगत देशात अनेकांचे बळी गेले आहेत कोरोना मुळे देशांतच नव्हे संपूर्ण जगात हाहाकार मजला आहे  करोनाच्या आतंकाने बेभान होऊन आपला जीव मुठीत जगातील मनुष्य सैरावैरा धावताना दिसत आहे 
काही केल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबायला तयार नाही अनेक प्रगत राष्ट्रांनी या कोरोना विषाणू पुढे आपले हात टेकले आहेत  मात्र भारत देशाने  सर्वच प्रसार माध्यमातून  करोना विषयी जनजागृती करून  इतर देशांच्या तुलनेत कोरोना चा प्रादुर्भाव कमी केल्याचे दिसून येत आहे ज्या कारणामुळे कोरोना संसर्ग वाढतो त्या सर्वच सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक कार्यक्रमावर उपाययोजना म्हणून बंदी घातली आहे  महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या कोरोना संदर्भात आचारसंहितेचे  भारतीय नागरिक तंतोतंत पालन करीत असल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे जगाच्या तुलनेत आपल्या देशात व महाराष्ट्रात सर्वात कमी बोटावर मोजण्या इतकी संख्या करोना ची दिसून येत आहे  कोरोना ला थांबविन हे भारताला मिळालेलं सर्वात मोठे यश म्हणावे लागेल
कारण चीन व इटली या प्रगत राष्ट्राने ही एक महामारी राष्ट्रीय संकट असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यापेक्षा त्याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे जास्तीत जास्त मनुष्य हानी चीन व इटली सारख्या देशाची झाली  हा प्रश्न एक देशाचा राहिला नाही  यांची झळ संपूर्ण जगाला सोसावी लागली  म्हणून  हा राष्ट्रीय पातळीवर प्रश्न निर्माण झाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आज चीनमध्ये कोरोना संदर्भात मोठ्या प्रमाणात अराजकता माजली आहे कोरोना चा संसर्ग झालेल्या व्यक्तीला सरळ गोळ्या घालून संपविले जात आहे तर भारत देश हा एक एक जिव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे त्याच्या जीविताची हमी घेत आहे एवढा फरक आमच्या व त्यांच्या मध्ये आहे 
या कोरोना विषयी जनजागृती करण्यात भारतीय प्रसारमाध्यमाची सर्वधिक भूमिका आहे  यांवर अणखी काही लस नसली तरी हा नेमका रोग कशापासून होतो यावर प्रतिबंधात्मक उपाय काय संसर्गजन्य रोगांना कसे रोखले पाहिजे  एकमेकांपासून दूर राहिल्यास यांचा एकमेकांना स्पर्श होणार नाही व संसर्ग होणार नाही सार्वजनिक ठिकाणे शाळा महाविद्यालय चित्रपट गृह बाजार पेठा मंगल कार्यालय गर्दीच्या ठिकाणी जाणे  अश्या अनेक पूर्व सूचना प्रसारमाध्यमाने केल्याने आज कोरोनाचा हैदोस दुसऱ्या देशापेक्षा आपल्या देशात कमी प्रमाणात आहे यावर नक्कीच विजय मिळवू परंतु यांची खरी जबाबदारी आपल्यावरच आहे कारण या अश्या राष्ट्रीय आपत्तीला तोंड देण्यासाठी आपला भारत देश सक्षम आहे  शासन प्रशासनाने केलेल्या उपाययोजनेला प्रतिसाद द्या त्याच्या आदेशाचे पालन करा कोरोनाची भिती बाळगू नका परंतु काळजी घ्या  आपणच आपल्या जीवनाची हमी घेऊ शकतो हे मात्र नक्कीच .....!