माजी सुभेदार आर इ भालेराव कोरोणाविरुद्धच्या लढाईत मैदानात

 माजी सुभेदार आर इ भालेराव कोरोणाविरुद्धच्या लढाईत मैदानात
 
उदगीर/ प्रतिनीधी


 जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून देशात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे. उदगीर शहरातसुद्धा कोरोनाचा संसर्ग वाढत असून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत 'सोशल डिस्टंसिग'चे पालन व्हावे, यासाठी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात काम करत आहे. पोलिस प्रशासनावर कामाची जबाबदारी वाढत असतानाच गुजरात आणि महाराष्ट्र येथील नामांकित 'उमेश सिक्युरिटी अँड प्लेसमेंट सर्व्हिसेस' चे संचालक तथा सेवानिवृत्त माजी सुभेदार आर. इ. भालेराव हे आपल्या एजन्सीसोबत मिळून कोरोनाशी लढण्यासाठी मैदानात उतरले आहेत. 
     कोरणा विषाणूच्या संसर्गामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर हे 'रेड झोन एरीया' म्हणून घोषित करण्यात आले असून, अशा परिस्थितीत पोलिस प्रशासनाला मदत व्हावी व कोरोनाचा संसर्ग टाळता यावा, या भावनेने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व उमेश सिक्युरिटी अँड प्लेसमेंट सर्व्हिसेसचे संचालक माजी सुभेदार  आर. इ. भालेराव, उपसंचालक  उमेश भालेराव, व्यवस्थापक  सुधीर कांबळे व फिल्ड ऑफिसर आकाश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली उमेश सिक्युरिटी एजन्सीचे सुरक्षारक्षक कोरोना वाॅरिअर्सच्या भूमिकेतून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र कार्य करत आहेत. यामध्ये विशाल भालेराव, शुभम भालेराव, इंद्रजित भालेराव, सुमित भालेराव, अर्जुन सूर्यवंशी, अजय कांबळे, मनोज गायकवाड, अभिजीत भालेराव, साईनाथ काळे, महेश कांबळे, प्रशांत सुतार, भालेराव महेश आदी सहभागी आहेत. 
   जंग के मैदान में बुलावा नहीं आता है, जिसका खून खोलता है वह अपने आप चला आता है। याप्रमाणे गुजरात व महाराष्ट्र येथील उमेश सिक्युरिटी एजन्सीचे संचालक माजी सुभेदार  भालेराव यांनी कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भालेराव यांनी देशाच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वपूर्ण युद्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे, त्यांनी देशासाठी केलेले कार्य, योगदान महत्वपूर्ण आहेच परंतू सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा राष्ट्र सेवेसाठी ते पुढे आले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी या लढाई दरम्यान लोकांनी विनाकारण घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुवावेत, अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडत असताना मास्कचा वापर करावा आणि शक्य असल्यास आपापल्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करावी, असे आवाहन भालेराव यांनी केले आहे.