जिल्ह्यातील वन लागवडीचे क्षेत्र वाढवीण्याचे उद्दिष्ट
लातूर / प्रतिनिधी
लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील वनाचे प्रमाण अंत्यत कमी आहे पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकुण क्षेत्राच्या 33%क्षेत्रावर वने असणे आवश्यक आहे पण या दोन जिल्ह्यातील प्रमाण 1% आसपास असलेले दिसून येते. यामुळे पुढील काळात या दोन्ही जिल्ह्यात सामाजिक वनीकरणच्या माघ्यामातुन वृक्षलागवड व संवर्धन होणे आवश्यक आहे असे मत राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे.
वृक्ष लागवड व संवर्धन या विषयावर आज लातूर येथे उस्मानाबाद, लातूर जिल्हातील आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीला अघ्यक्ष कृषी मुल्य आयोग पाशा पटेलज , विभागीय वन अधिकारी(प्रादेशिक)उस्मानाबाद श्री. गायकर, प्रियंका गंगावणे, श्री बोडके, सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी, लातूर उस्मानाबाद हे उपस्थित होते.
पुढील काळात सामाजिक वनीकरणाच्या माघ्यमातुन वृक्ष लागवड व संवर्धन करण्यासाठी नियोजन करावे लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील वनाचे प्रमाण वाढविण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागेचा शोध घेऊन पर्यावरण पुरक अशा वृक्षाचे रोपण करावे अशा सुचना राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या